Satara|गृहराज्यमंत्र्यांकडून तासवडे टोलनाक्यावर कोकणवासियांचे 'स्वागत' |Shambhuraj Desai|Sakal Media<br />वहागाव (सातारा) : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या मुंबईकर कोकणवासियांचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दुपारी तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्यावर आस्थेवाईकपणे विचारपूस करीत स्वागत केले. आपल्या व्यवसाय व नोकरीनिमित्त मुंबई परिसरात वास्तव्यास असणारे बहुतांशी कोकणवासिय प्रतीवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणाकडे येत असतात. राज्य शासनाने प्रतीवर्षाप्रमाणे यावर्षीही या मुंबईकर कोकणवासियांसाठी टोल सवलतीसह विविध उपाययोजनांची सोय केली होती. दरम्यान, आज दुपारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तासवडे (ता. कराड) येथील टोलनाक्यावर मुंबईहून कोकणाकडे निघालेल्या कोकणवासियांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. श्री. देसाई यांनी वाहनधारक, प्रवाशांना त्यांच्या प्रवासातील सेवा-सुविधांची विचारपूस करीत माहिती घेतली आणि त्यांना गणेशोत्सावासाठी शुभेच्छा दिल्या. (व्हिडिओ : तानाजी पवार)<br />#Satara #ShambhurajDesai #Ganeshotsav #TaswadeTollnaka